Guru Purnima 2024: महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा
Guru Purnima 2024: महाराष्ट्रामध्ये भाविकांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.
-
गुरुपौर्णिमेनिमित्त साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. -
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरांबाहेर शनिवारी रात्रीपासूनच रांग लावली होती. -
साईनामाच्या जयघोषामध्ये शिर्डीनगरी दुमदुमली आहे. -
शिर्डीमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करत रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. -
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये चोख बंदोबस्तही पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. -
मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठामध्येही भाविकांना दर्शनसाठी गेली. -
गुरु पौर्णिमेचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला. -
स्वामींच्या मठामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली आहे. -
स्वामींचे दर्शन घेताना भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनानेही सुंदर नियोजन केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement