जाहिरात

महानायक अमिताभ बच्चन यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान

आज दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या स्मृतिदिनी विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.

  • दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचं वितरण पार पडलं.
  • आज दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या स्मृतिदिनी विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.
  • यंदा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे.
  • याशिवाय संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी संगीतकार ए.आर.रेहमान यांना दीनानाथ मंगेशकर संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार अभिनेता रणदीप हुड्डा याला देण्यात आला.
  • मराठी अभिनेता अशोक सराफ यांना दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • अमिताभ बच्चन मराठी भाषा शिकत असल्याचं त्यांनी या कार्यक्रमावेळी सांगितलं.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com