डोंबिवली पुन्हा एकदा स्फोटाने हादरली, आगीची दाहकता दाखवणारे Photos
डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
-
डोंबिवली बुधवारी 12 जून रोजी पुन्हा एकदा मोठ्या स्फोटाने हादरली. -
डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. -
धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत आहेत. -
स्फोट आणि आगीनंतर पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. -
घटनेनंतर पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. -
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंगचे काम सुरु आहे. -
स्फोटानंतर बाजूलाच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ झाली. अखरे त्यांना घरी पाठवण्यात आले. -
आगीमुळे आजूबाजूला उभी असलेली काही वाहने जळून खाक झाली आहेत. -
आगीचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Advertisement
Advertisement
Advertisement