डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील शाळेसोबतचे खास नाते
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलशी खास नाते आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती...
-
साताऱ्यातील शाळेसोबतचे खास नाते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलशी खास नाते आहे.
-
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश : 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला होता.
-
बालपणीच्या आठवणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नसला तरी त्यांच्या बालपणाची आठ ते नऊ वर्षे येथेच गेली आहेत.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळा : देशपरदेशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही शाळा पाहण्यासाठी सातारा शहराला भेट देतात.
-
शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी : छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.
-
शाळेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा : जुलै 2018मध्ये मुंबई व नागपुरात काही मंत्र्यांशी यासंबंधीची महत्त्वपूर्ण चर्चा देखील झाली.
-
'भिवा रामजी आंबेडकर' : छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलच्या रजिस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नोंद भिवा रामजी आंबेडकर अशी करण्यात आली होती.
Advertisement
Advertisement
Advertisement