बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचं साक्षीदार असलेलं पुण्यातलं 'सामाजिक चळवळीचं घर'
पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का ? सन 1949 ते 1956 च्या काळात 7 वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात.
-
पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का ? सन 1949 ते 1956 च्या काळात 7 वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात.
-
तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली 16 हजार रुपयांना एका पारसी गृहस्थाकडून खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर, सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले, भाजे आणि बेडसेच्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता.
-
बाबासाहेब या बंगल्यात येऊन-जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करीत. राजकीय, सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात.
-
14 एप्रिल 1951 रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशनची बैठक पार पडली होती. अनेकांनी या बंगल्याच्या परिसरात गर्दी करत बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या होत्या. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल, खुर्च्या आणि अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत.
-
सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या.
-
जवळच असलेल्या देहूरोड मध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय या बंगल्यात घेतला होता.
Advertisement
Advertisement