'रोजगार हमी योजनेचे पैसे द्या, फुकटच्या साड्या नको,'; जव्हारच्या महिलांचा आक्रमक पवित्रा
आम्हाला फुकटच्या साड्या नको, त्या खरेदी करण्यासाठी सक्षम बनवा' असं म्हणत पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयात आंदोलन पुकारलं.
-
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयात मोर्चा काढला होता.
-
रेशनिंगमधून दिलेल्या साड्या परत करण्यासाठी जव्हारमधील महिलांनी हे आंदोलन पुकारलं होतं.
-
रोजगार हमी योजनेचं काम करून देखील चार-पाच महिन्यांपासून त्यांचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या; अशी मागणी या महिलांकडून करण्यात आली.
-
पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांचे तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त मजुरी थकीत आहे.
-
अगोदर आमचे हक्काचे पैसे द्या, आम्हाला साडी घेण्यासाठी सक्षम बनवा , फुकट काही नको असा पवित्र घेत महिला साड्या घेऊन तहसील कार्यालयात पोहोचल्या.
-
शासनाचे गेल्या महिन्यात सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (रेशनिंगमधून) दिलेल्या साड्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्या देखील परत केल्या.
Advertisement
Advertisement