जाहिरात

'उतू नको... मातू नको... घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...!' CM एकनाथ शिंदेंचा मुलाला मोलाचा सल्ला

Kalyan Lok Sabha Election Results 2024: कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर CM एकनाथ शिंदेनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला.

  • Kalyan Election Results : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे.
  • श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 89 हजार 636 मतं मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना 3 लाख 80 हजार 492 मतं मिळाली.
  • श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या विजयाचे सेलिब्रेशन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाला मोलाचा सल्ला दिला आहे.
  • "उतू नको... मातू नको...घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...", असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीकांत यांना दिला आहे.
  • श्रीकांत शिंदे विजयी झाल्यानंतर त्यांचे डोंबिवली शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
  • डोबिंवलीतील श्री गणेश मंदिरात त्यांनी सहकुटुंब पूजा केली. गणरायाची आरतीही केली.
  • डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांचे तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आभार व्यक्त केले.
  • दरम्यान हा विजय म्हणजे कल्याण लोकसभेच्या एका नव्या आणि अधिक गतिमान विकासाचा प्रारंभ आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
  • श्रीकांत शिंदे यांनी ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथील मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले.
  • "आजचा हा विजय मी सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना समर्पित करतो". - श्रीकांत शिंदे
  • "या विजयाचे खरे शिल्पकार माझ्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत. निवडणुकीच्या प्रचार काळात त्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले आहे. यासाठी सर्व महायुतीच्या माझ्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचेही आभार." - श्रीकांत शिंदे
  • All Images Credit - Eknath Shinde And Dr. Shrikant Lata Eknath Shinde Instagram
Listen to the latest songs, only on JioSaavn.com