PF काढण्याची सर्वात सोपी पद्धत
मात्र दरम्यान तुम्हाला गरज भासल्यास पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. हा निधी आपात्कालिन परिस्थितीत किंवा काही वैद्यकीय गरज भासल्यास काढू शकता.
-
भारतात जे लोक खासगी क्षेत्रात काम करतात, त्या सर्वांचे पीएफ खाते तयार केले जातात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ही भविष्यासाठी बचत योजना आहे. फोटो सौजन्य - EPFO
-
या योजनेत कंपनी आणि कर्मचारी दोघेही या खात्यात समान योगदान देतात. सरकार यावर वार्षिक व्याज देते. निवृत्तीनंतर या खात्यातील पैसे काढू शकता.
-
मात्र दरम्यान तुम्हाला गरज भासल्यास पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. हा निधी आपात्कालिन परिस्थितीत किंवा काही वैद्यकीय गरज भासल्यास काढू शकता. तुम्ही ऑनलाइन घरबसल्या पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावं लागेल. फोटो सौजन्य - Pexels
-
यानंतर ऑनलाइन एडवान्स क्लेमवर क्लिक करा. यानंतर तुमचा युएएन मेंबर पोर्टलवर आपल्या यूएएन आणि पासवर्डसह लॉग इन करा. ऑनलाइन सर्विसवर क्लिक करा. पुढे इपीएफहून पीएफ एडव्हान्स काढण्यासाठी फॉर्म निवडा.
-
यानंतर, क्लेम फॉर्म (फॉर्म 31, 19, 10C आणि 10D) निवडा आणि बँक खात्याचे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करून ते वेरिफाय करा. यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
-
यानंतर PF Advance ला Form 31 ला निवडा आणि खाली दिलेल्या कारणांपैकी एक निवडावं लागेल. यानंतर काढावयाची रक्कम त्यात भरा आणि बँक अकाऊंटच्या चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा. यानंतर घराचा पत्ता भरा.
-
शेवटी गेट आधार ओटीपीवर क्लिक करा, तुमच्या आधार लिंक्ड मोबाइलवर आय ओटीपी भरा. अशा प्रकारे तुम्ही केलेला क्लेम सबमिट झाला.
Advertisement
Advertisement
Advertisement