या 5 प्रकारांनी उडवलीय 'चहाबाजांची' झोप, तुम्हाला कोणता आवडतो?
गरम, वाफाळता चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरु होत नाही. सकाळी उठल्यावर किंवा दुपारी झोप घालवण्यासाठी एक कप चहा अनेकांना हवा असतो. वेळेला चहा सर्वांनाच लागतो. पण चहाबाज मंडळींना कोणत्याही वेळेला चहा लागतो. तुम्ही स्वत: ला चहा बाज म्हणत असाल तर चहाचे हे पाच प्रकार तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत.
-
चहाचे कितीही प्रकार आले तरी मसला चहाचं महत्त्व कमी होणार नाही. लवंग, इलायची, दालचिनी आणि चक्र फूल एकत्र करुन मसाला चहा केला जातो. हा सर्वात लोकप्रिय चहाचा प्रकार आहे.
-
एक कप चहामध्ये आल्याचा सुगंध, लिंबाचा आंबाटपणा आणि मधाचा गोडवा एकत्र असेल तर अजून काय हवं? चहा प्रेमींसाठी हा बेस्ट पर्याय आहे. ज्यांना दूध प्यायला आवडत नाही ती मंडळी या प्रकारचा चहा पिऊन स्वत:ची चहा पिण्याची हौस भागवू शकतात.
-
लिंबू, हळद आणि मसाले एकत्र करुन तयार केलेला चहा देखील छान लागतो. तुम्हाला गोड हवा असेल तर त्यामध्ये मधही टाकू शकता.
-
आलं आणि ज्येष्ठमध एकत्र करुन केलेला चहा रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी आहे. तुम्ही यामध्ये दूध देखील घालू शकता, हे विशेष
-
हा काश्मीरमधला एक पारंपारिक चहा आहे. गुलाबाच्या पाकळ्या, मसाले, बदामाचे तुकडे आणि बेकिंग सोडा एकत्र करुन तो तयार करतात. गुलाबाचा सुगंध, मसाले आणि बदाम यांच्या मिश्रणाचा हा चहा पिण्याची मजा काही औरच आहे.
Advertisement
Advertisement