कुंभ मेळ्यानंतर नागा साधू कुठे जातात ?
कुंभ मेळ्याचे सगळ्यात मोठे आकर्षण नागा साधूंचे असते. केसांच्या लांब जटा, गळ्यात लांबच लांब रुद्राक्षाच्या माळा, भरीरावर फासलेले भस्म आणि चेहऱ्यावर रौद्र भाव असलेले हे नागा साधू नागरी वस्तीतून जाण्याऐवजी जंगलातून जाणे पसंत करतात. असं सांगितलं जातं की हे साधू दिवसा प्रवास करत नाही. सगळं जग झोपेत असतानाच ते प्रवास करतात.
-
कुंभ मेळ्यासाठी देशभरातून नागा साधू येतात. नागा साधूंची साधना आणि परंपरा या इतक साधूंपेक्षा वेगळ्या असते.फोटो: Pexels
-
कुंभ मेळा संपला की नागा साधू आपापल्या आखाड्यात निघून जातात. हे आखाडे देशाच्या विविध भागांमध्ये आहेत. या आखाड्यांमध्ये नागा साधू ध्यानधारणा, योग आणि तपस्या करतात. फोटो: ANI
-
काही नागा साधू हिमालयात किंवा जंगलात जाऊन तपस्या करतात. फोटो: ANI
-
वैराग्य आणि तपस्या ही नागा साधूंची वैशिष्ट्ये आहेत. फोटो: ANI
-
नागा साधू कुंभ मेळा संपल्यानंतर तीर्थाटन करायला निघतात. जे तीर्थाटन करत नाहीत ते आपल्या आखाड्यात परतात.फोटो: ANI
Advertisement
Advertisement