जाहिरात

कोणी मुख्यमंत्री तर कोणी गृहमंत्री, महाराष्ट्रातील राजकारण्यांशी आहे या Bollywood कलाकारांचे नाते

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रातील काही आजी-माजी राजकारण्यांची मुलं-बाळं, नातलग बॉलीवूडमध्ये स्थिरावलेत. यातील काही नावं पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Gallery View
  • Riteish deshmukh - रितेश देशमुख याने बॉलीवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणून तो सर्वांना परिचित असला तरी त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    Riteish deshmukh - रितेश देशमुख याने बॉलीवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणून तो सर्वांना परिचित असला तरी त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • Sharvari Wagh - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची कन्या नम्रता यांची शर्वरी वाघ मुलगी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले मनोहर जोशी शिवसेना भाजप युतीचे पहिल्यांदा सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. शर्वरी वाघ हिने देखील बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली असून तिचा 'मुंज्या' चित्रपट जबरदस्त हिट झाला आहे.
    Sharvari Wagh - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची कन्या नम्रता यांची शर्वरी वाघ मुलगी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले मनोहर जोशी शिवसेना भाजप युतीचे पहिल्यांदा सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. शर्वरी वाघ हिने देखील बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली असून तिचा 'मुंज्या' चित्रपट जबरदस्त हिट झाला आहे.
  • Sagarika Ghatge - कागल संस्थानचे समरजितसिंह घाटगे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. समरजितसिंह घाटगे आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे चुलत भाऊ-बहिण आहेत.
    Sagarika Ghatge - कागल संस्थानचे समरजितसिंह घाटगे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. समरजितसिंह घाटगे आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे चुलत भाऊ-बहिण आहेत.
  • Smita Patil - अत्यंत देखणी आणि लाजवाब अभिनयाची साम्राज्ञी म्हणून स्मिता पाटील यांनी अल्पावधीत नाव कमावले होते. समांतर चित्रपट असो अथवा व्यावसायिक चित्रपट, दोन्हीमध्ये त्यांना अपार यश मिळाले. अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्राचे दीर्घकाळ सहकारमंत्री होते
    Smita Patil - अत्यंत देखणी आणि लाजवाब अभिनयाची साम्राज्ञी म्हणून स्मिता पाटील यांनी अल्पावधीत नाव कमावले होते. समांतर चित्रपट असो अथवा व्यावसायिक चित्रपट, दोन्हीमध्ये त्यांना अपार यश मिळाले. अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्राचे दीर्घकाळ सहकारमंत्री होते
  • Bhumi Pednekar - आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या भूमी पेडणेकर हिचे वडीलही महाराष्ट्राचे मंत्री होते. तिचे वडील म्हणजेच सतीश पेडणेकर यांनी कामगारमंत्री पद भूषविले होते.
    Bhumi Pednekar - आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या भूमी पेडणेकर हिचे वडीलही महाराष्ट्राचे मंत्री होते. तिचे वडील म्हणजेच सतीश पेडणेकर यांनी कामगारमंत्री पद भूषविले होते.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com