थंडीमध्ये लिंबू वर्गीय फळे जसे संत्री, मोसंबी या फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. यातून क जीवनसत्त्व मिळते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
आपल्या आहारात आल्याचा समावेश केल्याने फक्त पदार्थांची चवच वाढते, असे नाही. तर त्याचा शरीरासाठीही फायदा होतो. आल्यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे पचनप्रक्रियाही सुधारते.