Winter Health Tips : आजार तर सोडाच सर्दी पडसेही होणार नाही, थंडीत हे पदार्थ खाल्लेच पाहिजे
थंडीच्या मोसमात सर्दी पडसे आणि आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. मात्र या पदार्थांचा आहारात समावेश असेल तर सर्दी पडसे सोडा, तुम्ही आजारीही पडणार नाही.
-
थंडीमध्ये लिंबू वर्गीय फळे जसे संत्री, मोसंबी या फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. यातून क जीवनसत्त्व मिळते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
-
आपल्या आहारात आल्याचा समावेश केल्याने फक्त पदार्थांची चवच वाढते, असे नाही. तर त्याचा शरीरासाठीही फायदा होतो. आल्यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे पचनप्रक्रियाही सुधारते.
-
थंडीमध्ये लसूण खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. यातील अॅलिसिन हा घटक शरीरासाठी पोषक आहे, त्यामुळे आहारात लसणाचा समावेश करावा.
-
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, जे शरीराची झीज लवकर भरून काढण्यास मदत करतात. हळदीयुक्त दूध प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
-
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यासह अन्य लाभ मिळतील.
-
थंडीमध्ये मिळणाऱ्या स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, मलबेरी यांचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. याद्वारे शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
-
थंडीमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्यांमुळे शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा पुरवठा होतो.
-
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते, त्याशिवाय बियांमध्ये असलेले मिनरल्स रोगप्रतिकारक्षमता वाढीसाठी फायदेशीर ठरतात. Photo Credit : Canva
Advertisement
Advertisement
Advertisement