जाहिरात

देशभरात दिग्गजांसह सिनेकलाकारांचीही मतदानाला हजेरी, तुम्ही मतदान केलं का?

आज देशभरात चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. ठिकठिकाणी सिनेकलाकारांसह दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला.

  • गायिका बेला शेंडे हिने कुटुंबासह पुण्यात मतदान केलं.
  • माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांची कन्या जया यांनी हैद्राबाद येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला आणि बीडमध्ये मोठ्या संख्येते मतदान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
  • लोकशाहीचा उत्सव साजरा करूया, मतदान करूया! आम्ही करून आलो,तुम्हीही करा!जय हिंद!, अभिनेता सुबोध भावे याने पुण्यातून मतदान केलं.
  • सुपरस्टार चिरंजीवी हैद्राबाद येथे मतदानासाठी दाखल झाला होता.
  • पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं औक्षण करताना
  • बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मतदानासाठी केंद्रावर दाखल झाले.
  • भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील मतदान करण्यासाठी पुण्यातील रांगेत उभे असताना...
  • लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे, त्यामुळे नागरिकांनी कंटाळा न करता मतदानासाठी घराबाहेर पडा असं आवाहन सिने कलाकारांकडून केलं जात आहे.