'हे' फायदे वाचा आणि आजच सुरु करा मॉर्निंग वॉक
रोज सकाळी लवकर उठून चालावं असा सल्ला घरातील मोठी माणसं नेहमी देतात. आठवड्यातून चार वेळा 45 मिनिटं चाललं तरी तुम्ही वर्षभरात वजन कमी करु शकता. त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करण्याचीही गरज नाही.
-
रोज सकाळी लवकर उठून चालावं असा सल्ला घरातील मोठी माणसं नेहमी देतात. आठवड्यातून चार वेळा 45 मिनिटं चाललं तरी तुम्ही वर्षभरात वजन कमी करु शकता. त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करण्याचीही गरज नाही.
-
नियमित मॉर्निंग वॉक केल्यानं हार्ट अटॅकचा धोका जवळपास निम्मा होतो. ऱ्हदय विकाराचा धोका टाळण्यासाठी मॉर्निंग वॉक नक्की करावा.
-
रक्ताभिसरण (Blood Circulation) चांगले राहण्यासाठीही चालणे हा चांगला व्यायाम आहे. यामुळे उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शन या समस्या देखील कमी होतात.
-
चालण्यानं रक्तातील गुड कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते आणि ऱ्हदयविकाराचा धोका कमी होतो.
-
सकाळी मिळणारा ऑक्सिजन तुमच्या सांध्यांना (joints) ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचा आहे.
-
तुम्ही फिट आणि हेल्दी असता त्यावेळी तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. रोजच्या आव्हानांचा सामना करण्यात याचा फायदा होतो. सकाळी प्रसन्न हवेत फिरणं हा रोजच्या धावपळीच्या आयुष्यातील एक विरंगुळा आहे.
-
रोज सकाळी चालणं तुमच्या पाठीसाठीही चांगला व्यायाम आहे.
-
नियमित चालण्यानं तुमच्यातील सहनशक्ती वाढते. दीर्घकाळ व्यायाम करण्यासाठी याचा उपयोग होतो.
-
चालण्यानं तुम्हाला ऊर्जा मिळते. तुमचं मन शांत होतं. मन शांत आणि मूड प्रसन्न असेल तर त्याचा शारीरिक आणि अध्यात्मिक पातळीवरही फायदा होतो.
-
एक सामान्य व्यक्ती आठवड्यातील 4 दिवस सलग 45 मिनिटं चालत असेल तर आहारात काहीही बदल न करता वर्षभरात 8 ते 10 किलो वजन कमी करता येते. चालण्यानं तुमच्यातील स्थूलपणा कमी होतो. त्याचबरोबर तुमच्या स्नायूंसाठीही चालणे फायदेशीर आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement