उन्हाळ्यामध्ये चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका या 5 गोष्टी
अन्नपदार्थ खराब होऊ नये आणि भाज्या ताज्या राहाव्यात, यासाठी फ्रीज या उपकरणामुळे मोठी मदत मिळते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ टिकून राहावेत, यासाठी घरामध्ये रेफ्रिजरेटर असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? काही खाद्यपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये चुकूनही ठेवू नये. जाणून घेऊया यामागील सविस्तर कारण...
-
बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. थंड तापमानामुळे बटाट्यातील स्टार्चचे साखरेमध्ये रुपांतर होते. जे अमिनो अॅसिडच्या संपर्कात आल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब देखील होऊ शकतात.
-
कांदे देखील कधीही फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. थंड तापमानामुळे कांद्यांना बुरशी लागू शकते आणि ते मऊ देखील होतात. चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा असल्यास हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावा.
-
पालक फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर एखादे कापड अथवा स्वच्छ कागदामध्ये गुंडाळावे आणि फ्रीजमध्ये कोरड्या जागी ठेवावे. थंड तापमानामध्ये पालक ठेवल्यास खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये पालक ठेवू नये.
-
आपल्यापैकी बहुतांशजण फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवतात. पण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव तसेच पोषणतत्त्वावरही परिणाम होतो. त्यामुळे शक्य असल्यास फ्रीजऐवजी बाहेरच टोमॅटो ठेवणे उत्तम.
-
सुकामेवा फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यास अन्य खाद्यपदार्थांचा सुगंध सुकामेव्यास येतो. यामुळे सुकामेव्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फ्रीजऐवजी एखाद्या कोरड्या जागी सुकामेवा ठेवावा.
Advertisement
Advertisement