येवा, कोकण आपलाच असा, सलग सुट्ट्यांमुळे कोकणात मोदी गर्दी!
गेले काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणचं कोकणपण अधिकच खुलून दिसत आहे.
-
गेले काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडत आहे.त्यामुळे कोकणचं कोकणपण अधिकच खुलून दिसत आहे. -
सलग सुट्ट्या असल्याने कोकणात मोठी गर्दी पाहायला मिळाली. -
पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी वातावरणात गारवा जाणवत आहे, त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली आहेत. -
सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. -
कोकणातील समुद्रामध्ये पर्यटक मनमुरादपणे डुबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. -
शनिवारपासून कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत. -
रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. -
शनिवार-रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्यामुळे विविध पर्यटन ठिकाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement