मुलांना खेळण्यातून बरंच काही शिकता येतं. खेळता-खेळता त्यांना नव्या जगाची ओळख होते. शाळेतील अभ्यासही हसत-खेळत पूर्ण होतो. आई-वडिलांकडून मुलांना मिळणाऱ्या प्रेमाचा खेळणी हा पर्याय होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं.
मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारची खेळणी द्यावीत. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास भर देणारी खेळणी द्यावी. त्याचबरोबर ती मुलांसाठी सुरक्षित आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारी असावीत.
मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ न देणारी खेळणी त्यांना देऊ नयेत. खेळाच्या माध्यमातून रोजच्या आयुष्यातील अडचणींची ओळख मुलांना झाली तर त्यांचा सामजिक आणि भावनिक विकास होऊ शकतो.
मुलांना 1 किंवा 2 तासांपेक्षा जास्त व्हिडीओगेम खेळण्याची किंवा टीव्ही पाहण्याची परवानगी देऊ नये. 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना आवश्यक असेल तर आणि मोठ्यांच्या उपस्थितीमध्येच कॉम्पुटर वापरण्याची परवानगी द्यावी.