मुलांसाठी खेळणी खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
मुलांच्या आनंदासाठी प्रत्येक घरामध्ये खेळणी घेण्यात येते. खेळणी घेताना मुलांच्या भल्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
-
मुलांना खेळण्यातून बरंच काही शिकता येतं. खेळता-खेळता त्यांना नव्या जगाची ओळख होते. शाळेतील अभ्यासही हसत-खेळत पूर्ण होतो. आई-वडिलांकडून मुलांना मिळणाऱ्या प्रेमाचा खेळणी हा पर्याय होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं.
-
मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारची खेळणी द्यावीत. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास भर देणारी खेळणी द्यावी. त्याचबरोबर ती मुलांसाठी सुरक्षित आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारी असावीत.
-
मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ न देणारी खेळणी त्यांना देऊ नयेत. खेळाच्या माध्यमातून रोजच्या आयुष्यातील अडचणींची ओळख मुलांना झाली तर त्यांचा सामजिक आणि भावनिक विकास होऊ शकतो.
-
चांगली खेळणी ही ट्रेंडीग आणि महागडी असतात हा समज काढून टाका. मुलांनाही ही गोष्ट समजावून सांगा.
-
पुस्तकं, मासिकं वाचण्याची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी त्याचाही खेळण्यासारखा उपयोग करावा.
-
खेळणी विक्रेते त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणात करतात. त्या जाहिरातींची योग्य प्रकारे पडताळणी करुनच खरेदी करावी.
-
हिंसा, सामाजिक, जातीय आणि लैंगिक असमानतेला चालना देणाऱ्या नकारात्मक खेळण्यापासून मुलांना नेहमी दूर ठेवावं.
-
मुलांना 1 किंवा 2 तासांपेक्षा जास्त व्हिडीओगेम खेळण्याची किंवा टीव्ही पाहण्याची परवानगी देऊ नये. 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना आवश्यक असेल तर आणि मोठ्यांच्या उपस्थितीमध्येच कॉम्पुटर वापरण्याची परवानगी द्यावी.
-
मुलांसाठी खरेदी केलेली खेळणी सुरक्षित असावीत. त्यांची टोकं धारधार नसावीत, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-
काही खेळण्यांचे लहान भाग सहज होतात. ती मुलांच्या हाताला सहज लागणार नाहीत याची काळजी घ्यावी, कारण मुलं अनेकदा ते तुकडे तोंडात टाकतात.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement