जाहिरात

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळेस त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेवर भाष्य केले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
  • लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विधान केले.
  • पंतप्रधान मोदींनी म्हटले की, महिलांवरील अत्याचारासंदर्भात लवकरात लवकर तपास झाला पाहिजे. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे.
  • पीएम मोदी असेही म्हणाले की,"आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आपल्या माता, बहिणी, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये संताप आहे".
  • देश, समाज, आपल्या राज्य सरकारांना या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल - PM मोदी
  • महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चौकशी झाला पाहिजे आणि आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे, समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे - PM मोदी
  • आपल्याकडील गुन्हेगारी कायदे आता आपण न्यायिक संहितेच्या रुपात आणले आहेत. याद्वारे नागरिकाला न्याय मिळावा, ही भावना दृढ केलीय - PM मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 98 मिनिटांच्या भाषणामध्ये महिला सुरक्षेपासून ते देशाचा विकास करण्यापर्यंतचे त्यांचे व्हिजन मांडले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दहा वेळा लाल किल्ल्याहून देशाला संबोधित केले आहे.
Switch To Dark/Light Mode