महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल - PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळेस त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेवर भाष्य केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
-
लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विधान केले.
-
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, महिलांवरील अत्याचारासंदर्भात लवकरात लवकर तपास झाला पाहिजे. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे.
-
पीएम मोदी असेही म्हणाले की,"आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आपल्या माता, बहिणी, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये संताप आहे".
-
देश, समाज, आपल्या राज्य सरकारांना या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल - PM मोदी
-
महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चौकशी झाला पाहिजे आणि आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे, समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे - PM मोदी
-
आपल्याकडील गुन्हेगारी कायदे आता आपण न्यायिक संहितेच्या रुपात आणले आहेत. याद्वारे नागरिकाला न्याय मिळावा, ही भावना दृढ केलीय - PM मोदी
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 98 मिनिटांच्या भाषणामध्ये महिला सुरक्षेपासून ते देशाचा विकास करण्यापर्यंतचे त्यांचे व्हिजन मांडले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दहा वेळा लाल किल्ल्याहून देशाला संबोधित केले आहे.
-
All Photo Credit - PTI
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement