जाहिरात

T-20 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा 30 PHOTOS

T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. भारताने सामना जिंकल्यानंतर 'इंडिया, इंडिया' आणि 'मेन इन ब्लू'चे नारे घुमत होते. टीम इंडियानेही जल्लोष करत विजयाचा आनंद मैदानावरच साजरा केला.

  • टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 स्वतःच्या नावे केला आहे.
  • सामना जिंकल्यानंतर दमदार खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्त जाहीर केली.
  • टीम इंडियाने पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वामध्ये 2007मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
  • आता 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
  • सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली होती की टीम इंडियाचा पराभव होतोय की काय? असे भारतीयांना वाटले.
  • पण जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने दमदार बोलिंग करत विजय खेचून आणला.
  • रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये गेल्या वर्षी टीम इंडियाने वन-डे वर्ल्ड कपमध्येही फायनलमध्ये धडक मारली होती. पण संघ विजय मिळवू शकला नाही.
  • टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहचा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' अवॉर्डने सन्मान करण्यात आला.
  • T-20 वर्ल्ड कपमध्ये भारत तिसरा असा संघ आहे, जो दुसऱ्यांदा वर्ल्ड कप चॅम्पियन ठरला आहे.
  • टीम इंडियाव्यतिरिक्त वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने दोनदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
  • विजयाचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते. त्याने 76 धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि टीम इंडियाचा स्कोअर 176 धावांपर्यंत आणला.
  • T-20 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा PHOTOS
  • विराट कोहलीला 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्डही मिळाला.
  • कॅप्टन रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 8 सामन्यांमध्ये 257 धावा केल्या आहेत.
  • सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • टीम इंडियानं सात धावांनी फायनल मॅच जिंकली. भारतीय क्रिकेट टीमचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपला.
  • विजेतेपदाबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटूंनी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
  • रोहित शर्माने यापुढे वन-डे आणि टेस्ट क्रिकेट खेळत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
  • विराट कोहलीला फायनलमधील कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, 'आता पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता. आम्हाला नेमकं हेच साध्य करायचे होते".
  • विराट कोहलीने 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केले होते.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं, 'T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमनं अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केले. फायनल मॅचमधील विजय देखील असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.'
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,"चॅम्पियन्स. आपली टीम जबरदस्त पद्धतीने टी-20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट टीमचा अभिमान आहे".
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टी20 विश्वकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
  • ग्रेट टीम इंडिया...आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषक 2024 वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय टीमचं कौतुक करणारी पोस्ट X वर केली आहे.
  • भारताने सामना जिंकल्यानंतर काही क्षणांनी कॅमेरा हार्दिकच्या दिशेनं पॅन करण्यात आला. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
  • 30 वर्षांच्या भारतीय टी20 टीमच्या व्हाईस कॅप्टनने एक मोठी लढाई दृढ निश्चयाच्या जोरावर जिंकली होती. सारे जग टी20 क्रिकेटच्या इतिहासातील तो महान क्षण अनुभवत होते.
  • हार्दिक मैदानातून बाहेर जात असताना आयसीसीच्या ब्रॉडकास्टरनं त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी विचारले त्यावेळी हार्दिकचे शब्द होते, 'मला डोळे पुसू दे...'
Listen to the latest songs, only on JioSaavn.com