जाहिरात

'गोव्याच्या किनाऱ्यावर...', डिसेंबर नव्हे पावसाळ्यात गोव्याची खरी मजा, या महोत्सवांना नक्की जा!

बहावा वृक्ष बहरला की पावसाचं आगमन झालंच म्हणून समजा. गोव्यातल्या पावसाची तर मजाच न्यारी. फेसाळणारा समुद्र, हिरवागार शालूने जणू नटलेला निसर्ग, यामध्ये भर पडते ती इथल्या सणांची. विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे गोव्यातील सण हे इथल्या मान्सूनचं खरं आकर्षण असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, या लेखात आपण पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या अशा काही सणांची माहिती घेऊ.

  • "द मड फेस्टिव्हल" म्हणून ओळखला जाणारा धार्मिक सण, गोव्यात पावसाळ्यात विशेषतः जूनमध्ये साजरा केला जाणारा पारंपारिक उत्सव आहे. पोंडा येथील मार्सेल गावातून उगम पावलेला, हा अनोखा उत्सव देवकी कृष्ण मंदिरास केंद्रस्थानी ठेवून साजरा केला जातो.
  • हा उत्सव भगवान कृष्ण आणि त्याची आई देवकी यांना समर्पित आहे. सणाची नेमकी उत्पत्ती अस्पष्ट असली तरी, गावकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने त्याचे स्मरण करतात. या उत्सवात सहभागी आनंदाने चिखलात लोळतात आणि पारंपारिक खेळांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जातात. देवकी कृष्ण मंदिराशेजारी असलेले मैदान उपस्थितांचे स्वागत करत गर्दीच्या रिंगणात रूपांतरित होते.
  • बोंदेरा उत्सव: मान्सूनच्या पावसाने निसर्ग चिंब होत असताना, दिवारचे नयनरम्य बेट बोंदेरा महोत्सवाने न्हाऊन निघते. ऑगस्टच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत परेड. ज्यामध्ये गावातील प्रतिस्पर्धी पाड्यांमध्ये हास्य विनोद केला जातो. प्रत्येक गट रंगीबेरंगी झेंड्यांनी सजलेले चित्ररथाचे प्रदर्शन करतो. सुंदर चित्ररथासाठी बक्षीस आयोजित केलेले असते त्यामुळे चित्ररथांची स्पर्धा असते. या उत्सवाला पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, ते संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.
  • तौशाचे फेस्त - या विस्तृत मेजवानीच्या केंद्रस्थानी एक लक्ष्यवेधक प्रथा आहे जिथे भक्त सेंट ॲन यांना आदर म्हणून काकडी अर्पण करतात. हंगामात भरपूर प्रमाणात काकडी तयार होते त्यामुळे या हंगामात हा सण साजरा केला जातो असे म्हटले जाते. गोव्यात हंगामातील पहिली कापणी ही काकडीची केली जाते.
  • तौशाचे फेस्त - ख्रिस्ती धर्मगुरूंच्या निर्देशानुसार, लोक दोन काकड्या आणतात. या काकड्या मदर मेरीच्या पुतळ्याजवळ ठेवतात. उत्सवादरम्यान भेट दिलेल्या या काकड्या नंतर स्थानिक समुदाय, पुजारी आणि जवळपासच्या गावांमध्ये वाटल्या जातात. काहीजण ताज्या काकड्यांचा आस्वाद घेण्यास प्राधान्य देतात, तर काहीजण सॅलडमध्ये समाविष्ट करतात.
  • सांगोड उत्सव - मान्सून उत्सवाला सुरुवात करणारा सांगोड उत्सव, गोव्यातील मासेमारी करणाऱ्या समुदायाद्वारे साजरा केला जाणारा पारंपारिक बोट उत्सव आहे. दरवर्षी, 29 जून रोजी, गोव्यात सेंट पीटर आणि सेंट पॉल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. या सणापासूनच 'रॅम्पन' मासेमारीच्या हंगामाची सुरूवात होते. विधीवत पूजा करून पुढील वाटचालीसाठी बोटी तयार केल्या जातात. छोट्या नाव एकत्र आणून त्या एकमेकांसोबत जोडल्या जातात.चर्चची प्रतिकृती या नावेच्या मध्यभागी उभारली जाते.
  • गोव्यातील सर्वात लोकप्रिय मान्सून उत्सवांपैकी एक म्हणजे सांजाव महोत्सव. हा उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या नावावरून साजरा केला जाणारा हा सण जल केंद्रित आहे. विहिरी, नद्या आणि तलावांमध्ये उडी मारून जलक्रीडा करत हा सण साजरा केला जातो.
  • सांजाव महोत्सव दरवर्षी 24 जून रोजी गोव्यात साजरा केला जातो. पाण्यात तरंगणारे रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपारिक संगीत, स्थानिक लोक आणि पर्यटक एकसारखे दिसणारे कोपल्स (फुलांची माळा) घालतात, यामुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडते.
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;