जाहिरात

गुजरातवर पुन्हा एकदा चेन्नईचे 'राज', तरुण कॅप्टनच्या लढाईत ऋतुराजची बाजी

या आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच कॅप्टन झालेल्या ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्या टीममधील लढतीत कोण बाजी मारणार? याकडं सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष होतं.

  • आयपीएलमध्ये मंगळवारी (26 मार्च) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा 63 रन्सनी पराभव केला. चेन्नईचा या सिझनमधील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयानंतर त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (सौजन्य : @CricCrazyJohns)
  • चेन्नईत झालेल्या या मॅचमध्ये यजमान टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 206 रन्स केले. चेन्नईकडून शिवम दुबेनं सर्वात जास्त रन्स केले. त्यानं फक्त 23 बॉल्समध्ये 51 रन्स काढले. (सौजन्य : @chennaiipl)
  • 20 वर्षांच्या समीर रिझवीला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करण्याची संधी मिळाली. समीरनं पहिल्याच बॉलवर थेट राशिद खानला सिक्स लगावत जबरदस्त सुरुवात केली. त्यानं राशिदच्या एकाच ओव्हरमध्ये दोन सिक्स लगावले. (सौजन्य : @chennaisuperkings)
  • महेंद्रसिंह धोनीचा फिटनेस 42 व्या वर्षी देखील एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. धोनीनं उजवीकडं झेपावत विजय शंकरचा अफलातून कॅच घेतला. धोनीच्या या कॅचचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (सौजन्य : @mufaddalvohra)
  • गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. 207 रन्सचा पाठलाग करताना त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. (सौजन्य : BCCI/IPL)