Jhansi Hospital Fire : 10 बाळांचा होरपळून मृत्यू, झाशीच्या हॉस्पिटलमधील अग्नितांडवाची भीषणता दाखवणारे PHOTOS
Jhansi Hospital Fire : झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी रात्री (15 नोव्हेंबर) भीषण आग लागली होती. आगीमध्ये 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला.
-
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री भीषण आग लागली.
-
हॉस्पिटलमधील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला.
-
आगीमध्ये गंभीर स्वरुपात जखमी झालेली लहान मुले मृत्यूशी झुंज देत आहेत.
-
राज्य सरकारने शनिवारी (16 नोव्हेंबर) मृत बाळांच्या पालकांना 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय.
-
दुर्घटनेची माहिती मिळताच CM योगींनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना झाशीमध्ये रवाना होण्यास सांगितले.
-
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी झाशीचे विभागीय आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांना (डीआयजी) 12 तासांमध्ये घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
शॉर्ट सर्किटमुळे आग भडकल्याची माहिती समोर आली आहे.
-
दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
-
आग भडकल्यानंतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाल्याचे म्हटले जात आहे.
-
भीषण आगीमध्ये हॉस्पिटलमधील साहित्याची राख झाली आहे.
-
(All Image Credit - PTI)
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement