होमफोटोफक्त काश्मीरच नाही तर इथंही पाहाता येईल पृथ्वीवरचा स्वर्ग!
फक्त काश्मीरच नाही तर इथंही पाहाता येईल पृथ्वीवरचा स्वर्ग!
काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग मानले जाते. आपल्या देशात काश्मीरच्या तोडीची अनेक सुंदर ठिकाणं आहेत. त्यापैकी एका खास ठिकाणीची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हा एक बेस्ट पर्याय आहे.
आपल्या देशाच्या उत्तरेला असलेला हिमालय पर्वत हा त्याच्या भव्यतेसोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखला जातो. हिमालयातील अनेक ठिकाणं जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. हिमाचल प्रदेशातील किन्नौर हे देखील यापैकीच एक खास ठिकाण आहे.
जेव्हा सूर्याची किरणं किन्नौर पर्वतावर पडतात : किन्नोर आणि तिबेटच्या सीमेवर 6 हजार 50 मीटर उंच किन्नौर कैलाश पर्वत आहे. या पर्वताच्या शिखरावर शिवलिंग आहे... आणि अनेक जण किन्नोर कैलाशचा ट्रेक करत पर्वताच्या शिखरावर पोहोचतात.