जाहिरात

मुंबई, ठाण्यातील कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत आदित्य आणि अमित ठाकरे कितव्या क्रमांकावर ?

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत 30 ऑक्टोबरला संपली. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.

Gallery View
  • मुंबई आणि ठाण्यातील उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत भाजपचे पराग शाह हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 3383 कोटींची संपत्ती आहे.
    मुंबई आणि ठाण्यातील उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत भाजपचे पराग शाह हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 3383 कोटींची संपत्ती आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर 447 कोटींची संपत्ती असलेले मंगलप्रभात लोढा आहे. लोढा हे भाजपकडून मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
    दुसऱ्या क्रमांकावर 447 कोटींची संपत्ती असलेले मंगलप्रभात लोढा आहे. लोढा हे भाजपकडून मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
  • शिंदेंच्या शिवसेनेचे ओवळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक हे 333.32 कोटींचे मालक आहेत.
    शिंदेंच्या शिवसेनेचे ओवळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक हे 333.32 कोटींचे मालक आहेत.
  • कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर हे 129.80 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
    कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर हे 129.80 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
  • कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे शिवसेना(उबाठा) पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर हे 95.81 कोटींचे मालक आहेत.
    कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे शिवसेना(उबाठा) पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर हे 95.81 कोटींचे मालक आहेत.
  • मुंब्रा कळवा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 83.14 कोटींचे मालक आहेत.
    मुंब्रा कळवा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 83.14 कोटींचे मालक आहेत.
  • मुंब्रा कळवा मतदारसंघातूनच आव्हाडांचे शिष्य असलेले नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असून ते 76.87 कोटींचे मालक आहेत.
    मुंब्रा कळवा मतदारसंघातूनच आव्हाडांचे शिष्य असलेले नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असून ते 76.87 कोटींचे मालक आहेत.
  • मनसेचे एकमेव आमदार आणि कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे राजू पाटील हे 24.79 कोटींचे मालक आहेत.
    मनसेचे एकमेव आमदार आणि कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे राजू पाटील हे 24.79 कोटींचे मालक आहेत.
  • शिवसेना(उबाठा) पक्षाचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे हे 23.43 कोटींचे मालक आहेत.
    शिवसेना(उबाठा) पक्षाचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे हे 23.43 कोटींचे मालक आहेत.
  • आदित्य ठाकरेंचे चुलत बंधू आणि मनसेचे माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे 15.6 कोटी रुपयांचे मालक आहेत.
    आदित्य ठाकरेंचे चुलत बंधू आणि मनसेचे माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे 15.6 कोटी रुपयांचे मालक आहेत.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com