मुंबई, ठाण्यातील कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत आदित्य आणि अमित ठाकरे कितव्या क्रमांकावर ?
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत 30 ऑक्टोबरला संपली. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.
-
मुंबई आणि ठाण्यातील उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत भाजपचे पराग शाह हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 3383 कोटींची संपत्ती आहे.
-
दुसऱ्या क्रमांकावर 447 कोटींची संपत्ती असलेले मंगलप्रभात लोढा आहे. लोढा हे भाजपकडून मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
-
शिंदेंच्या शिवसेनेचे ओवळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक हे 333.32 कोटींचे मालक आहेत.
-
कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर हे 129.80 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
-
कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे शिवसेना(उबाठा) पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर हे 95.81 कोटींचे मालक आहेत.
-
मुंब्रा कळवा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 83.14 कोटींचे मालक आहेत.
-
मुंब्रा कळवा मतदारसंघातूनच आव्हाडांचे शिष्य असलेले नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असून ते 76.87 कोटींचे मालक आहेत.
-
मनसेचे एकमेव आमदार आणि कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणारे राजू पाटील हे 24.79 कोटींचे मालक आहेत.
-
शिवसेना(उबाठा) पक्षाचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे हे 23.43 कोटींचे मालक आहेत.
-
आदित्य ठाकरेंचे चुलत बंधू आणि मनसेचे माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे 15.6 कोटी रुपयांचे मालक आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement