जाहिरात

'मतदान करा, फरक पडतो'; राजकीय मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क!

आज महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

  • भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवे अंजूर येथील प्राथमिक शाळेत उभारलेल्या बूथ क्र. ३१८ मध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.
  • मुख्य सचिव नितीन करीर यांनी मतदान हक्क बजावला
  • नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विहित गाव येथे मतदानाचा बजावला आणि सर्वांना मतदान करण्याचे देखील आवाहन केले.
  • दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं.
  • मायावतींनी बजावला मतदानाचा हक्क...
  • उत्तर मध्य मुंबईचे मविआचे उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीसह मतदान केलं.
  • धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला
  • धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला असून मतदान करायला निघण्यापूर्वी त्यांचे घरी औक्षण करण्यात आले.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पूर्वेकडे स.वा. जोशी येथील मतदान केंद्रात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
  • कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवली पूर्वेतील बोग्रासवाडी परिसरातील प्रकाश विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला आहे
  • पालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Listen to the latest songs, only on JioSaavn.com