जाहिरात

जिद्द असावी तर अशी! दोन्ही हातांनी अपंग, मात्र आठवीत 85 % आणि दहावीची जोरदार तयारी!

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील बागली येथे राहणारी शांता जन्मापासून अपंग आहे. मात्र अभ्यासासाठी तिचा व्यासंग काही वेगळाच आहे.

  • मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील बागली येथे राहणारी शांता जन्मापासून अपंग आहे. मात्र अभ्यासासाठी तिचा व्यासंग काही वेगळाच आहे. यातूनच ती आपल्या हिंमतीला पंख देत नवी झेप घेण्याची तयारी करीत आहे. ती इयत्ता दहावीची परीक्षा देतेय. हात नसतानाही ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच लिहिते.
  • शांता अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, चित्रकला आणि इतर गोष्टींमध्येही हुशार आहे. तिने अनेक स्पर्धेत यश मिळवलं आहे. तिचे हात तिची ताकद आहे. यासाठी शाळेपासून कुटुंबातील सदस्य तिची खूप मदत करतात.
  • सुदूर आदिवासी अंचलमध्ये एका मजुर कुटुंबात शांताचा जन्म झाला. तिचे वडील सांगतात, त्यांना चार मुलं आहेत. त्यापैकी शांता तिसऱ्या क्रमांकाची आहे. जन्मापासून हातांनी दिव्यांग असल्या कारणाने ती पायांनी लिहित होती.
  • शांता चांगला अभ्यास करते. शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळवते. इतकच नाही तर मोबाइल वापरणे आणि कम्प्युटरचा किबोर्डही तिला सहज वापरता येतो. शांताला उच्च शिक्षण घ्यायचं आहे.
  • शांताच्या शाळेचे प्राचार्य नंदलाल परिहार यांनी सांगितलं की, नर्सरीपासून शांता आमच्या शाळेत शिकते. तिच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तिला बारावीपर्यंत मोफत शिक्षण आहे. याशिवाय पुस्तक-वहीचा खर्च शाळेकडून केला जातो.