जाहिरात

Mahakumbh Mela 2025 : गूढ नागा साधूंची भव्य मिरवणूक, भाविक अचंबित

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अमृत स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. मात्र जशी नागा साधूंच्या मिरवणुकीची वार्ता कळाली भाविकांची ही मिरवणूक पाहण्यासाठीही गर्दी उसळली होती. सूर्य उगविण्यापूर्वीच हे नागा साधू हर हर महादेवचा गजर करत संगमाच्या दिशेने झप-झप चालत निघाले होते. या नागा साधूंबद्दलचे गूढ हे आजही कायम आहे. त्यामुळेचे त्यांची मिरवणूक हा महाकुंभ मेळ्यातील सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय असतो.

  • महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांना एक वेगळीच शांती लाभते असे म्हणतात, कुंभनगरीत आल्यानंतर जगाचा विसर पडतो आणि भाविक एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात प्रवेश करतात. नागा साधू हे कुंभमेळ्याचे आकर्षण असते, त्यांच्या रहस्यमयी विश्व पाहण्याची संधीही कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाभते.
  • यंदाचा महाकुंभ मेळा हा सर्वार्थाने अतिभव्य आणि दिव्य ठरताना दिसतोय.
  • पवित्र स्नानासाठी नागा साधू जयघोष करत नदीमध्ये उतरले तेव्हा वातावरण प्रचंड भारलेले होते.
  • या हवाई दृश्यातून कुंभ मेळ्याच्या भव्यतेचा अंदाज लावणे सोपे होते.
  • प्रयागराज इथे 144 वर्षांनी होणारा महाकुंभ मेळा, गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीचा संगम आणि त्यात मकर संक्रांतीचा योग यामुळे आजचे स्नान हे अमृत स्नान मानले जाते.
  • भीषण दिसणारे नागा साधू पवित्र स्नानाचा असा आनंद लुटताना दिसले.
  • विविध आखाड्यातील महिला भाविकांनीही महाकुंभातील अमृत स्नान केले.
  • सनातन धर्म, आध्यात्माचा अद्भुत आविष्कार अनुभवण्यासाठी आलेले असंख्य देशातील नागरीकही स्नान करताना दिसले.
  • मकर संक्रांतीला महाकुंभ मेळ्यातील पहिले अमृत स्नान पार पडले.
  • सगळे नागा साधू या निमित्ताने संगमावर जमले होते.
  • स्नान झाल्यानंतर परत निघालेल्या नागा साधूंना पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.
  • 13 आखाड्यातील साधूंनी एकामागोमाग एक संगमात उतरत अमृत स्नान केले.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com