जाहिरात

Mahakubh 2025 : कुंभ मेळ्यातील 'पेशवाई' परंपरेबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज इथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. अर्ध कुंभ मेळा हा दर सहा वर्षांनी आयोजित केला जातो. याचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वारला होते. महाकुंभ मेळा हा हिंदू भाविकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रयागराजमध्ये 12 पूर्ण कुंभमेळे आयोजित झाल्यानंतर महाकुंभ मेळा आयोजित करण्यात येतो. वर्षांमध्ये सांगायचे झाल्यास 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो.

  • महाकुंभ मेळ्यामध्ये 'पेशवाई' हा खूप मोठा सोहळा असतो ही एक ऐतिहासिक परंपरा आहे. विविध आखाड्यांचे साधू-संत जेव्हा कुंभ नगरीमध्ये प्रवेश करतात त्याला पेशवाई म्हणतात. पेशवाई हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ मान्यवरांचे स्वागत असा आहे.
  • पेशवाईमध्ये साधू-संतांचे थाटामाटात आगमन होते. हत्तीवर, घोड्यावर, रथावर स्वार होत साधू संत कुंभ नगरीत प्रवेश करत असतात. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक या साधू-संतांचे स्वागत करत असतात. साधू-संतांच्या हातामध्ये त्यांच्या आखाड्याचा ध्वज असतो. साधू-संतांची फौजच कुंभ मेळ्यासाठी कुंभनगरीत दाखल होत असते.
  • पेशवाई सोहळ्याचे नाव आता बदलण्यात आले असून त्याला आता नगर प्रवेश म्हटले जाते. महाकुंभ 2025 साठी साधू-संतांचा नगर प्रवेश झाला असून त्यांचे आगमन पाहण्यासाठी असंख्य लोकं जमा झाली होती.
  • 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 ची सुरुवात होणार असून हा महाकुंभ मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com