जाहिरात

Nagpur Double Decker Flyover: नागपूर बदलतंय! देशातील सर्वात लांब डबल डेकर पुलाचे लोकार्पण

नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

  • देशातील सर्वात लांब डबल डेकर चार पदरी उड्डाणपुलाचे शनिवारी (5 ऑक्टोबर) दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • या उड्डाणपुलामुळे आता कामठी रोड गुरुद्वाराजवळ चौपदरी वाहतूक मार्ग साकार झाला आहे. या उड्डाणपुलामध्ये मेट्रो मार्गिकेचाही समावेश आहे.
  • शनिवारपासून (5 ऑक्टोबर) हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. हा डबल डेकर उड्डाणपूल 5 किमी 670 मीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची किंमत 573 कोटी रुपये इतकी आहे. (Photo Credit-Nitin Gadkari X)
  • या मार्गादरम्यान गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहेत. या उड्डाणपुलासाठी गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल उभारण्यात आला आहे.
  • या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील तसेच नागपूर जबलपूर महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच इंधनाचीही बचत होणार आहे.