जाहिरात

CM शिंदेंनी पुण्यातील पूरबाधित परिसर आणि स्थलांतरित नागरिकांची घेतली भेट

पुणे शहारमध्ये अतिवृष्टीमुळे मुठा नदी आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या परिसराला CM शिंदेंनी सोमवारी (5 ऑगस्ट) भेट दिली व परिस्थितीची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला.

  • पुणे शहारमध्ये अतिवृष्टीमुळे मुठा नदी आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या परिसराला CM शिंदेंनी सोमवारी (5 ऑगस्ट) भेट दिली व परिस्थितीची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला.
  • जुनी सावंगी परिसरात दाखल होऊन त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत ठेवण्यात आलेल्या स्थलांतरित नागरिकांशीही संवाद साधला.
  • येथे प्रशासनाच्या वतीने त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे तसेच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.
  • तसेच वारंवार पुराची टांगती तलवार दूर करण्यासाठी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
  • यानंतर CM शिंदेंनी पाटील वाडी, पीएमपी कॉलनी, वाकडेवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयामध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
  • नागरिकांना ब्लेंकेट्स तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यावेळेस करण्यात आले.
  • परिसरामध्ये आरोग्य पथक आणि जवळपासचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य पथकाला दिल्या आहेत.
  • सिंहगड रोड येथील एकता नगर परिसराला भेट देऊन येथील परिस्थिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणून घेतली.
  • स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी शासन पातळीवर घेतलेल्या निर्णयांची त्यांना माहिती दिली.
  • या भागातील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, पाण्याची नवीन लाईन टाकून पायाभूत सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. (Photo Credit - CM Eknath Shinde Instagram)
Switch To Dark/Light Mode