जाहिरात

चिमुकलींवर अत्याचार, बदलापूरकर संतापले! घटनेनंतर राजकीय चिखलफेक सुरू

बदलापूर येथील एका प्रसिद्ध शाळेमध्ये नर्सरीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी स्थानिकांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे.

  • बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
  • बदलापुरात बंद पुकारण्यात आला असून शाळा परिसरात पालकांसह नागरिकांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे.
  • संतापलेल्या नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको देखील केला. यावेळेस संतप्त जमावाने दगडफेकही केली.
  • दरम्यान बदलापुरातील चिमुकलींवर अत्याचार प्रकरणी राजकीय चिखलफेक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
  • शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी म्हटले की,"ही शाळा भाजपाच्या लोकांशी संबंधित होती, असे मला कळलंय. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता यामध्ये असला तरी त्यावर विनाविलंब कारवाई झाली पाहीजे. यात जर भाजपचे कार्यकर्ते असले तर निबंध घेऊन सोडून देणार आहात का? राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे". (Photo Credit -ShivSena X)
  • भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले की,"उद्धव ठाकरेंना भाजपशिवाय काही दिसतच नाही. मुलीवर अत्याचार झालाय तिला न्याय मिळाला पाहिजे, हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे. त्यांनी चिथावणीखोर बोलण्याऐवजी संयम ठेवावा. आम्ही मागणी केलीय की या प्रकरणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमावे". (Photo Credit - Kisan Kathore X)
  • बदलापुरातील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. (Photo Credit - Devendra Fadnavis X)
  • खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेय की,"ज्यांनी हे कृत्य केलं त्याला पकडलं आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. लोकांना आवाहन करायचंय की आपण आंदोलन सुरू ठेवावे मात्र लोकल सेवा सुरू करावी".(Photo Credit - Shrikant Shinde X)
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलंय की, "सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृहखाते मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे". (Photo Credit - Jayant Patil X)
Listen to the latest songs, only on JioSaavn.com