Year Ender 2024: क्रिकेट असाे अथवा चेस, हॉकी असो अथवा टेनिस; विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांची धमाकेदार कामगिरी
2024 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय क्षेत्र ठरले आहे. यंदाच्या वर्षापासून भारतीय क्रीडा क्षेत्रात नव्या युगाला सुरुवात झाली आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. क्रिकेट, चेस, हॉकीमध्ये भारतीय संघांने, खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले. रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत 2024 च्या सुरुवातीलाच धमाल उडवून दिली. डी.गुकेश याने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत या वर्षाचा शेवट गोड केला.
-
World Chess Olympiad : भारताच्या बुद्धीबळपटूंनी 45 व्या आंतरराष्ट्रीय चेस महासंघाच्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी पहिले स्थान मिळवले. ही विजेतेपद स्पर्धा जिंकण्यासोबतच बुद्धीबळपटूंनी वैयक्तिक सुवर्णपदकेही पटकावली.