Year Ender 2024: क्रिकेट असाे अथवा चेस, हॉकी असो अथवा टेनिस; विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांची धमाकेदार कामगिरी
2024 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय क्षेत्र ठरले आहे. यंदाच्या वर्षापासून भारतीय क्रीडा क्षेत्रात नव्या युगाला सुरुवात झाली आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. क्रिकेट, चेस, हॉकीमध्ये भारतीय संघांने, खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले. रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत 2024 च्या सुरुवातीलाच धमाल उडवून दिली. डी.गुकेश याने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत या वर्षाचा शेवट गोड केला.
-
Rohan Bopanna Tennis Player : रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावले. मॅथ्यू एबडेन हा त्याचा साथीदार होता या जोडीने इटलीच्या सिमॉन बोलेली आणि अँड्रिया वावस्सोरीचा पराभव केला.
-
Asian Hockey Tournament Men's : आशियाई हॉकी विजेतेपद स्पर्धेत पुरुषांच्या संघाने चीनचा अंतिम सामन्यात 1-0 ने पराभव केला. पुरुषांच्या संघाने पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.
-
Asian Hockey Tournament Women's :आशियाई हॉकी विजेतेपद स्पर्धेत महिला संघाने एकही सामना गमावला नाही. महिलांच्या संघानेही चीनच्या संघाला 1-0 नेच पराभूत केलं.
-
Archery World Cup Tournament : एप्रिल महिन्यात तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 15 पदके पटकावली होती. भारताने या स्पर्धेत 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली होती.
-
World Chess Olympiad : भारताच्या बुद्धीबळपटूंनी 45 व्या आंतरराष्ट्रीय चेस महासंघाच्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी पहिले स्थान मिळवले. ही विजेतेपद स्पर्धा जिंकण्यासोबतच बुद्धीबळपटूंनी वैयक्तिक सुवर्णपदकेही पटकावली.
-
World Chess Championship : डी.गुकेशने वर्षाचा शेवट गोड केला. डोम्माराजू गुकेश याने जागतिक बुद्धीबळ विजेतेपद स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. विश्वनान आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा अवघ्या 18 वर्षांचा आहे.
Advertisement
Advertisement