नथ घालून आलेल्या छाया कदमचा कान्समध्ये जलवा
मराठी अभिनेत्री छाया कदमनं कान्स फेस्टिव्हलमध्ये सर्वांना प्रभावित केलंय.
-
77 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये (Cannes Film Festival 2024) दोन नावे प्रचंड चर्चेत आहेत. पहिलं म्हणजे पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' (All We Imagine as Light) आणि दुसरं नाव म्हणजे याच चित्रपटात काम करणाऱ्या छाया कदम. ( फोटो सौजन्य : @Festival_Cannes )
-
छाया कदम या कान्स फिल्म फेस्टीव्हीलमध्ये नथ घालून पोहोचल्या तेव्हा उपस्थितांनी उभे राहून आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ( फोटो सौजन्य : @Festival_Cannes )
-
आपलं कौतुक होताना पाहून छाया कदम यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले होते. ( फोटो सौजन्य : @Festival_Cannes )
-
'लापता लेडीज' चित्रपटातील भूमिकेने छाया कदम यांनी हिंदी चित्रपचसृष्टीलाही आपली दखल घ्यायला लावली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ( फोटो सौजन्य : @chhaya.kadam.75 )
-
'लापता लेडीज'मधील भूमिकेसाठी कौतुक होत असतानाच छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटातील भूमिकेसाठीही कौतुक झाले आहे. ( फोटो सौजन्य : @chhaya.kadam.75 )
-
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी छाया कदम यांच्यासाठी विशेष ड्रेस तयार करण्यात आला होता. ( फोटो सौजन्य : @Festival_Cannes )
Advertisement
Advertisement