जाहिरात

Mumbai Weather: वादळी वारे, जोरदार पावसामुळे मुंबई विस्कळीत

Mumbai Weather: वादळी वारे आणि अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली.

  • ठाणे आणि मुलुंडमध्ये रेल्वेचा खांब वाकल्याने मध्य रेल्वेची विस्कळीत झाली. वांगणी रेल्वे स्थानकावरील पत्रे देखील उडाले.
  • वडाळ्यामध्येही इमारतीच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला लोखंडी ढाचा कोसळला.
  • हा लोखंडी ढाचा कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले.
  • कल्याण पश्चिमेकडील लोकउद्यान परिसरातील एका गाडीवर झाड कोसळले.
  • जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
  • सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली.
  • मुंबईसह आसपासच्या परिसरात धुळीचे वादळ आल्याने नागरिकांना काही वेळासाठी मनस्ताप सहन करावा लागला.
  • अचानक आलेल्या पावसामुळे विमानसेवा देखील काही वेळाकरिता विस्कळीत झाली होती.
  • ठिकठिकाणी झाेड कोसळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
  • ऐरोलीमध्ये विद्युतवाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
  • घाटकोपरमधील छेडा नगर परिसरामध्ये भलेमोठे होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळले. या दुर्घटनेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com