जाहिरात

Microsoft : विमाने गंडली, व्यवहार थांबले; तांत्रिक बिघाडामुळे हलकल्लोळ

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या ऑनलाईन सेवांमध्ये बिघाड झाल्याने जगभरात मोठी समस्या निर्माण झाली. हवाई वाहतूक क्षेत्र असो अथवा बँकींग क्षेत्र, ऑनलाईन कामकाजावर अवलंबून असलेल्या बऱ्याच क्षेत्रांना या बिघाडाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला. अमेरिकेप्रमाणेच आशियाई खंडातही या बिघाडाचा फटका बसला.

  • मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या ऑनलाईन सेवांमध्ये बिघाड झाल्याने जगभरात मोठी समस्या निर्माण झाली.
  • अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी,भारतासह अनेक देशात विमानसेवा ठप्प
  • Microsoft च्या ऑनलाईन सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी गहजब उडाला
  • हवाई वाहतूक सेवा, बँकींग क्षेत्र, लंडन स्टॉक एक्स्चेंज यासह अनेक ऑनलाईन सेवांना या बिघाडाचा फटका बसला
  • या बिघाडाचा पहिला फटका गुरुवारी अमेरिकेला बसला होता. Azure आणि Microsoft 365 या सेवा वापरण्यात अडचणी येऊ लागल्या
  • या बिघाडामुळे विमानांची टेक ऑफ 2 तास थांबली होती. शुक्रवारी मुंबईमध्येही याचा फटका बसण्यास सुरुवात झाली. प्रवाशांच्या चेक-इनमध्ये अडचणी येऊ लागल्या.
  • हाँग काँगमध्येही मुंबईसारखीच समस्या निर्माण झाली. मायक्रोसॉफ्टने बिघाड दुरुस्त झाल्याचा दावा केल्यानंतर काही क्षणात पुन्हा समस्या निर्माण झाली
  • कंपनीने Azure आणि Microsoft 365 ऑनलाईन सेवांमध्ये काही तासांसाठी बिघाड झाल्याचे मान्य आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की समस्येबाबत केल्या जात असलेल्या तक्रारींमध्ये लक्ष घातले जात आहे.
Switch To Dark/Light Mode