महाराष्ट्राच्या शिरपेचात मानचा तुरा, गोंदियाच्या लेकीने जिंकला मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धेचा किताब
Miss South Asia World 2024: गोंदियातील रहिवासी शितल डोये-भोसलेने मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धेचा किताब जिंकला आहे.
-
Miss South Asia World 2024: महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेली शितल डोये-भोसले हिने 'मिस साऊथ एशिया वर्ल्ड-2024' स्पर्धेचा किताब पटकावला आहे.Miss South Asia World 2024: महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेली शितल डोये-भोसले हिने 'मिस साऊथ एशिया वर्ल्ड-2024' स्पर्धेचा किताब पटकावला आहे.
-
माय ड्रीम टीव्ही एंटरटेनमेंटतर्फे डॅलस (टेक्सास, USA) येथे आयोजित करण्यात आलेल्या या सौंदर्य स्पर्धेत दक्षिण आशियातील देशांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.माय ड्रीम टीव्ही एंटरटेनमेंटतर्फे डॅलस (टेक्सास, USA) येथे आयोजित करण्यात आलेल्या या सौंदर्य स्पर्धेत दक्षिण आशियातील देशांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
-
यामध्ये पारंपरिक पोशाख, बुद्धिमत्ता आणि सौंदर्याच्या आधारावर सौंदर्यवतींना गुण देण्यात आले. बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस इंडिया पूजा बत्राच्या हस्ते शितलच्या डोक्यावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला.यामध्ये पारंपरिक पोशाख, बुद्धिमत्ता आणि सौंदर्याच्या आधारावर सौंदर्यवतींना गुण देण्यात आले. बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस इंडिया पूजा बत्राच्या हस्ते शितलच्या डोक्यावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला.
-
मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर शितल डोये भोसलेने दिलेली प्रतिक्रिया - "एक स्त्री म्हणून तुमच्यातील शक्तीला कधीही कमी लेखू नका. आपण आपले स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम आहोत, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा".मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर शितल डोये भोसलेने दिलेली प्रतिक्रिया - "एक स्त्री म्हणून तुमच्यातील शक्तीला कधीही कमी लेखू नका. आपण आपले स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम आहोत, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा".