महाराष्ट्राच्या शिरपेचात मानचा तुरा, गोंदियाच्या लेकीने जिंकला मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धेचा किताब
Miss South Asia World 2024: गोंदियातील रहिवासी शितल डोये-भोसलेने मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धेचा किताब जिंकला आहे.
-
Miss South Asia World 2024: महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेली शितल डोये-भोसले हिने 'मिस साऊथ एशिया वर्ल्ड-2024' स्पर्धेचा किताब पटकावला आहे.
-
माय ड्रीम टीव्ही एंटरटेनमेंटतर्फे डॅलस (टेक्सास, USA) येथे आयोजित करण्यात आलेल्या या सौंदर्य स्पर्धेत दक्षिण आशियातील देशांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
-
यामध्ये पारंपरिक पोशाख, बुद्धिमत्ता आणि सौंदर्याच्या आधारावर सौंदर्यवतींना गुण देण्यात आले. बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस इंडिया पूजा बत्राच्या हस्ते शितलच्या डोक्यावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला.
-
शितलने यापूर्वी 'मिसेस भारत कॅलिफोर्निया इलाइट 2023' आणि 'मिसेस भारत यूएसए एलिट 2023' या स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
-
शितलने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयामध्ये बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (बी.टेक) ही पदवी संपादित केली आहे.
-
मिस साऊथ एशिया वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर शितल डोये भोसलेने दिलेली प्रतिक्रिया - "एक स्त्री म्हणून तुमच्यातील शक्तीला कधीही कमी लेखू नका. आपण आपले स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम आहोत, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा".
Advertisement
Advertisement