जाहिरात

आदित्य-अमितपूर्वी 'या' ठाकरेंनी लढवली होती निवडणूक, मित्राचा केला होता पराभव

प्रबोधनकार ठाकरेंच्या घराण्यातील चौथी पिढी ही निवडणुकीत उतरल्याचे पाहायला मिळते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी सत्तेबाहेर राहून सत्तेवर नियंत्रण ठेवले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही त्यांचा कित्ता गिरवला होता. आदित्य ठाकरे हे या घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले ज्यांनी निवडणूक लढवली.

  • आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे हे कॅबिनेटमंत्रीही झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024 ) ते वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.
  • या दोघांच्या आधी ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीने निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता.
  • अभिनेते- फुड व्लॉगर कुणाल विजयकर यांनी ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगितले.
  • जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना वर्ग प्रतिनिधी पदासाठी निवडणूक झाली होती.
  • या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कुणाल विजयकर आमनेसामने आले होते.
  • ही निवडणूक राज ठाकरे यांनी जिंकल्याचे कुणाल यांनी सांगितले. विजयकर यांनी म्हटले की "राजने जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेस किंवा भाजपविरोधात नव्हती, तर ती माझ्याविरोधात होती. त्या निवडणुकीत राज जिंकलाही होता."