होमफोटोMovies in 2024 : Google वर सर्वाधिक सर्च केलेले Top 10 सिनेमे
Movies in 2024 : Google वर सर्वाधिक सर्च केलेले Top 10 सिनेमे
यंदा बॉलीवूड चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. Google वर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या 10 चित्रपटांची नावे काय आहेत ते पाहूया.
स्त्री-2 हा Google वर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला चित्रपट ठरला. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला. कमाईप्रमाणे सर्चमध्येही हा चित्रपट अव्वल ठरला.
Oscar 2025 च्या स्पर्धेतून भारतातर्फे अधिकृतरित्या पाठवण्यात आलेला लापता लेडीज हा बाहेर पडला आहे. हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
विजय सेतुपतीची प्रमुख भूमिका असलेल्या 'महाराजा' चित्रपटाने या यादीमध्ये सहावे स्थान मिळवले आहे. हा चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता.
कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या मंजुम्मेल बॉईज चित्रपटाने या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. हा चित्रपट निर्मितीच्या खर्चापेक्षा अधिक कमाई करणारा ठरला आहे.
गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळतो आहे. 'विजय' चा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (G.O.A.T) हा चित्रपट आठव्या क्रमांकावर होता.