Movies in 2024 : Google वर सर्वाधिक सर्च केलेले Top 10 सिनेमे
यंदा बॉलीवूड चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. Google वर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या 10 चित्रपटांची नावे काय आहेत ते पाहूया.
-
स्त्री-2 हा Google वर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला चित्रपट ठरला. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला. कमाईप्रमाणे सर्चमध्येही हा चित्रपट अव्वल ठरला.
-
दुसऱ्या क्रमांकावर प्रभास आणि दीपिका पादुकोण यांची भूमिका असलेला कल्कि 2898 एडी हा चित्रपट आहे.
-
सामाजिक विषयांवर आधारीत, प्रेरणादायी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त कुतूहल असून 12वीं फेल हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
Oscar 2025 च्या स्पर्धेतून भारतातर्फे अधिकृतरित्या पाठवण्यात आलेला लापता लेडीज हा बाहेर पडला आहे. हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
-
'जय हनुमान' हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर असून , तेजा सज्जा यांचा हा चित्रपट सुपरहिट सिनेमा ठरला.
-
विजय सेतुपतीची प्रमुख भूमिका असलेल्या 'महाराजा' चित्रपटाने या यादीमध्ये सहावे स्थान मिळवले आहे. हा चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता.
-
कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या मंजुम्मेल बॉईज चित्रपटाने या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. हा चित्रपट निर्मितीच्या खर्चापेक्षा अधिक कमाई करणारा ठरला आहे.
-
गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळतो आहे. 'विजय' चा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (G.O.A.T) हा चित्रपट आठव्या क्रमांकावर होता.
-
अभिनेता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट नवव्या क्रमांकावर आहे.
-
दहाव्या नंबरवर 'आवेशम' चित्रपट असून फहाद फासिलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement