पावसामुळे मुंबईकर सुखावले, पण रस्ते-रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने भडकले
मुंबईमध्ये मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
-
मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीतील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. (ANI Photo)
-
रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला.
-
काही तासांच्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याने प्रशासनाकडून तत्काळ काम सुरू करण्यात आले.
-
चुनाभट्टी परिसरामध्ये रेल्वे रुळावर साचले पावसाचे पाणी (ANI Photo)
-
मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका, कुर्ला स्टेशनवरही सर्वत्र पाणीच पाणी. (ANI Photo)
-
मुंबईमध्ये मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Photo IANS)
-
पाणी साचल्याने कुर्ला स्थानकात रेल्वे खोळंबल्या होत्या. अखेर वैतागलेल्या प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवर चालू लागले. (ANI Photo)
-
ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे पहाटे तीन ते चार तास ठाण्यापासून पुढे लोकल ठप्प झाली होती.
-
मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील भुयारी मार्गामध्येही साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिक.(ANI Photo)
-
मुसळधार पावसामुळे सरकारी व खासगी शाळा- महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. (ANI Photo)
-
अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement