जाहिरात

आईला माझे स्वयंवर रचायला आवडेल! बबिता भाभीवर टप्पूचे मौन

तारक मेहता का उल्टा चष्मा ही बरीच गाजलेली मालिका आहे. यामध्ये राज उनाडकटने टप्पूची भूमिका साकारली होती. तर बबिता भाभीची भूमिका मुनमुन दत्ताने साकारली होती.

  • अभिनेता राज उनाडकट सध्या 'युनायटेड स्टेट ऑफ गुजरात' या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने गुजराती भाषिक सिनेमे आणि कार्यक्रमांकडे वळल्याचे राजने सांगितले.
  • 5 वर्ष टप्पूची भूमिका साकारल्यानंतर राज उनाडकटने मालिकेला रामराम ठोकला होता. तारक मेहता ही माझ्या आय़ुष्याला कलाटणी देणारी मालिका होती असं राज याने म्हटलं होतं.
  • राज उनाडकटची आई त्याच्यासाठी योग्य साथीदाराचा शोध घेत आहे.
  • राजने गंमतीत म्हटलंय की माझी आई माझ्यासाठी स्वयंवरही रचू शकते.
  • आपला जीवनसाथी हा समजूतदार असावा अशी अपेक्षा राज याने व्यक्त केली आहे.
  • राज उनाडकट आणि बबिता भाभीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचा दावा केला जात आहे.
  • तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज याला या मालिकेत बबिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या मुनमुनबद्दल विचारलं असता त्याने याबाबत बोलणं टाळलं.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com