नागाच्या दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट, 4 दिवसांनी होणार शोभिताशी लग्न
शोभिता आणि नागा चैतन्य यांचा हळद समारंभ ज्या दिवशी झाला त्याच दिवशी नागाची पहिली पत्नी समांथाने तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी शेअर केली.
-
नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या प्री-वेडींग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 29 नोव्हेंबर रोजी या दोघांचा हळदी समारंभ झाला.
-
या दोघांच्या हळदीचे फोटो नागा चैतन्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हळदी सोहळ्यासाठी शोभिताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि त्यावर केशरी रंगाची ओढणी मॅच केली होती. दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने परिधान केलेली शोभिता फार छान दिसत होती.
-
नागा आणि शोभिताच्या लग्नाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
-
याच समारंभासाठी शोभिताने लाल रंगाची साडी निवडली होती आणि त्याच रंगाशी मॅचिंग असा लॉग स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. विविध प्रकारचे दागिने परिधान केलेल्या शोभितावरून नागाची नजर हटता हटत नव्हती.
-
नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. नागाचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झाले होते.
Advertisement
Advertisement