जाहिरात

जम्मू कश्मीर ते तमिळनाडू अवघ्या 8 दिवसांत कापले, सायकलपटू अमित समर्थ यांची जबरदस्त कामगिरी

जम्मू कश्मीर ते तमिळनाडू हे अंतर 3758 किलोमीटरचे असून हे अंतर डॉ.अमित समर्थ यांनी 8 दिवसांत कापले.

  • रेस अ‍ॅक्रॉस इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. ही सायकलिंग स्पर्धा भारतच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील लांब पल्ल्याची स्पर्धा आहे.
  • जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3758 किलोमीटरचे असून हे अंतर पार करायला अंदाजे 12 दिवसांचा कालावधी लागतो
  • मूळच्या नागपूरच्या असलेल्या डॉ.अमित समर्थ यांनी 3758 किलोमीटरचे अंतर 8 दिवस 2 तास आणि 17 मिनिटांमंध्ये पार केले.
  • जम्मू कश्मीरमध्ये थंडी, मध्य भारतातील कडक उन्हाळा बंगळुरूमध्ये पोहोचल्यानंतर तुफान पाऊस अशा बिकट परिस्थितीतही समर्थ यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
  • रेस अ‍ॅक्रॉस इंडिया ही रेस अ‍ॅक्रॉस अमेरिकेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या स्पर्धेाला जागतिक सायकलिंक महासंघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणानेही मान्यता दिलेली आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com