जम्मू कश्मीर ते तमिळनाडू अवघ्या 8 दिवसांत कापले, सायकलपटू अमित समर्थ यांची जबरदस्त कामगिरी
जम्मू कश्मीर ते तमिळनाडू हे अंतर 3758 किलोमीटरचे असून हे अंतर डॉ.अमित समर्थ यांनी 8 दिवसांत कापले.
-
रेस अॅक्रॉस इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. ही सायकलिंग स्पर्धा भारतच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील लांब पल्ल्याची स्पर्धा आहे.
-
जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3758 किलोमीटरचे असून हे अंतर पार करायला अंदाजे 12 दिवसांचा कालावधी लागतो
-
मूळच्या नागपूरच्या असलेल्या डॉ.अमित समर्थ यांनी 3758 किलोमीटरचे अंतर 8 दिवस 2 तास आणि 17 मिनिटांमंध्ये पार केले.
-
जम्मू कश्मीरमध्ये थंडी, मध्य भारतातील कडक उन्हाळा बंगळुरूमध्ये पोहोचल्यानंतर तुफान पाऊस अशा बिकट परिस्थितीतही समर्थ यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
-
रेस अॅक्रॉस इंडिया ही रेस अॅक्रॉस अमेरिकेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या स्पर्धेाला जागतिक सायकलिंक महासंघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणानेही मान्यता दिलेली आहे.
Advertisement
Advertisement